एका स्थिर स्थिती अंतर्बाह्य व्यापून असल्यावर दुसरा लेख आणि तिसरा लेख ही संकल्पना हा मनाचा विक्षेपच.
>> अशाप्रकारे एक आणि एकच काम करतांना, एका क्षणी तुम्हाला एका स्थिर स्थितीचं भान येईल
श्वास घेणं हेच फक्त 'एक आणि एकच' काम होऊ शकतं, जाणीवेत आणि नेणीवेत. त्यामुळे ही व्याख्या सर्वसमावेशक होत नाहीयेय. कर्मेंद्रियांकदून केलेलं जाणारं एक आणि एकच काम अस म्हणणं सयुक्तिक ठरावं.
प्रश्नांचे सिक्वेन्स न सोडता फक्त त्या त्या प्रश्नांनाच नेमकी उत्तरे द्या.
१. समोर म्हणजे सरळ समोर पाहा
हे खुपच अमूर्त झालं! म्हणजे सरळ समोर बघता न आल्याने फलनिष्पत्ती होऊ शकली नाही असा मुद्दा उपस्थित होऊ शकतो.
म्हणून, सरळ म्हणजे नेमकं कुठे? असंख्य भौतिक वस्तू समोर असतात त्यामुळे नेमके कुठे हे समजणं गरजेचं आहे.
उदा. बॉस, चुक नसताना, त्याच्या केबीनमधे बोलावून फायर करतोय. ह्या प्रसंगी समोर म्हणजे नेमके कुठे बघायचे कारण समोर बॉसच आहे. शिवाय आजूबाजूला काय ऐकायचे? कारण तोच अद्वातद्वा बोलतोय आणि ते बोलणे ऐकूणच हा बिकट प्रसंग आला आहे.
२. तुम्ही वर्णन केलेले उपाय मनाचा निरास करू शकत नाहीत. ह्याचा अर्थ काय?
माझा प्रश्न तुमच्या उपायसाधनेवर होता. तो उपाय कसा वेगळा आहे (वर्णन केलेल्या उपायांपेक्षा) त्यामागची शास्त्रिय बैठक किंवा मानसिक बैठक जरा खोलात जाउन सांगा. तत्त्वज्ञान नको, सामान्य माणसाला नेमकं समजेल असं. अर्थात, मनाचे पैलू निष्प्रभ करणं हे म्हणजे मनाचा निरास हे तुमच उत्तर असेल तर, तुम्ही वर्णन केलेल्या उपायाने ते नेमकं कसं होतं हे शारिरीक/मानसिक पातळीवर ते स्पष्ट करा.
३. त्यामुळे साधना किती वेळ करायची हा प्रश्न नाही; साधक सरळ समोर पाहयला किती वेळ घेणार हा प्रश्न आहे, हेही संदिग्ध नाही का?
म्हणजे समोर निराकार स्वच्छ दिसेपर्यंत तरी ही दुहेरीसाधना कराचीच लागेल का ? कि एकदा ठरवलं की आता निराकार दिसणारच आणि समोर बधितले आणि आजूबाजूचं ऐकू आलं की झालं ?
- (अभ्यासू) सोकाजी