तुमचे विश्लेषण अतिसुलभ झाले आहे असे वाटते.
काँग्रेसमुक्त भारत अशी प्रतिज्ञा केलेल्या भाजपाला साथ देऊन स्वतःचे आणखी खच्चीकरण करून घेण्याची तयारी आता तरी कॉंग्रेस दाखवील अशी मुळीच शक्यता नव्हती. काँग्रेस ने तशी तयारी दाखविली असती तरी भाजपाने कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस साथ घेतली नसती. काँग्रेसमुक्त भारत प्रतिज्ञा करण्याची कारणे बरीचशी सैद्धांतिक असली, तरी एक मुख्य कारण हे पण आहे की राष्ट्रीय पातळीवर आता भाजपाचा एकमेव प्रतिस्पर्धी काँग्रेस आहे. बाकी सगळे प्रादेशिक पक्ष आहेत. एकदा काँग्रेसला कायमचे गाडून टाकले, की भाजपाची राष्ट्रीय पातळीवर वाट मोकळी आहे. म्हणून, काँग्रेस ने महाराष्ट्रात भाजपाला साथ देण्याची तयारी दाखविली असती तरी भाजपाने कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसची साथ घेतली नसती.
तरीही देवेन्द्रजी "मी पुन्हा येईन हे कश्याच्या आधारावर म्हणत होते हे कळणे अवघडच आहे. याचे उत्तर सोपे आहे, पण त्याचे अनेक पैलू आहेत. पहिला, मैदानात उतरताना नेहमीच "मी पहिला येणार" अश्या आत्मविश्वासानेच उतरायचे असते. मग ते मैदान लढाईचे असो, खेळाचे असो, परीक्षा / इंटरव्ह्यू / पुषोत्तम करंडक . . . काहीही असो. ‘आम्ही एक विकेट राखून जिंकू शकलो तरी खूप झाले. इनिंग डिफीट देणे तर शक्यच नाही." असा विचार करून मैदानात उतरणारे जिंकत नसतात. टीम खेळात तर हा आत्मविश्वास सतत बोलून दाखवावा लागतो, सहकाऱ्यांचे मनोधैर्य बळकट करण्या करता. निवडणुकीत तर आत्मविश्वास सतत बोलून दाखविल्याने तुमच्या बाजूने "हवा" पण तयार होऊ शकते. हे ही लक्षात घ्या, की ते भाजपा पुन्हा येईल असे म्हणत नव्हते, तर मी पुन्हा येईन असे म्हणत होते. यात त्यांच्या पक्षांतर्गत प्रतीस्पर्धयांना (जसे, कदाचित एकनाथ खडसे) पण एक "संदेश" होता. उगाच स्वप्ने पाहू नका किंवा कारस्थाने रचू नका, मीच पुन्हा येणार आहे.
बुद्धीबळाच्या खेळा प्रमाणेच राजकारणात पण काही शॉर्ट टर्म ओबजेकटीव्स असतात व काही लॉन्ग टर्म ओबजेकटीव्स असतात. व कधी कधी लॉन्ग टर्म ओबजेकटीव्स करता शॉर्ट टर्म ओबजेकटीव्सचा बळी द्यावा लागतो. अमित शहा हे राजकारणातले सुपर ग्रँड मास्टर आहेत. त्यांचे शॉर्ट टर्म ओबजेकटीव्स काय होते व लॉन्ग टर्म ओबजेकटीव्स काय होते, हे तुमच्या-माझ्या सारख्या व्यक्तीला आत्ता तरी कळणे शक्य नाही. कदाचित पुढे काही घटनां वरून आपण त्याचा अंदाज लावू शकू. विरुद्ध बाजूला त्यांचा सामना करू शकेल अशी एकच व्यक्ति होती, ती म्हणजे शरद पवार. तसे अहमद पटेल पण होते, पण शरद पवारांना जसे आपले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते, तसे अहमद पटेल यांना नाही. म्हणून ते मुरलेले राजकरणी असून पण निष्प्रभ. आणि बाकी सर्व हौशे-नवशे-गवशे . . . .
आज एक व्हाटसएप मेसेज फिरत आहे, की जपान सरकार कडून बुलेट ट्रेन करता आलेला एक खूप मोठा निधि महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत होता. हा निधी शेतकाऱ्यांना कर्ज माफी करता वापरुन शेतकाऱ्यांचे आशीर्वाद मिळवायचे, व बुलेट ट्रेन चे खच्चीकरण करून मोदींना तोंडघशी पाडायचे, त्याच बरोबर बुलेट ट्रेनला विरोध असणाचे पण आशीर्वाद मिळवायचे, असा काँग्रेसचा डाव होता. दोन दिवस आपला मुख्य मंत्री नेमून भाजपाने हे पैसे केंद्र सरकार कडे वर्ग केले, शिवसेना- काँग्रेस यांच्या Reach च्या बाहेर. खरे का खोटे, माहीत नाही. कधीतरी कळेल.