संजयजी,

काही मूलभूत तत्वे नीट समजून घ्या. 

पहिले - तुमचे चमत्कारिक विधान तुम्हाला कणमात्र उलगडा झालेला नाही. ज्या गोष्टी सिद्ध करता येत नाहीत, त्यात कोणाला काय अनुभव आला, हे ज्याचे त्यानेच सांगायचे असते. उदाहरणार्थ - एकाच हॉटेल मध्ये अनेक लोक तीच भाजी खातात. कोणाला तिखट लागते, तर कोणाला अळणी लागते; कोणाला वाटते - वाह, मस्तच झाली होती, तर कोणाला ती अजिबात आवडलेली नसते. इत्यादी. मला उलगडा झाला का; काय उलगडा झाला;  कणमात्र झाला का क्विंटल भर झाला; हे मी आणि फक्त मीच सांगू शकतो. तुम्ही किंवा इतर कोणीही त्या बद्दल काहीही सांगू शकत नाही.    

दुसरे, "आपण व्यक्ती आहोत ही धारणा कायम झालेली आहे ! "  हा सगळ्यात मोठा  विनोद आहे कारण ती धारणाच तर दूर करणं म्हणजे अध्यात्म !   अध्यात्म म्हणजे काय हे ठरविण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले ? आणि "सर्व सिद्ध हेच सांगतात" वगैरे भाकडकथा मला सांगू नका. तुम्हाला ओशो सिद्ध वाटत असेल, मला तसे वाटत नाही. (मला काय वाटते ते लिहिले, तर हा प्रतिसाद प्रकाशितच होणार नाही) असो. तर, अध्यात्म/ ब्रह्म/ अंतिम सत्य/ निराकार/ . . .  इत्यादि विषयांची गम्मत अशी आहे की काहीही ठोस व नक्की नसल्याने प्रत्येकाला आपापले अध्यात्म/ ब्रह्म/ अंतिम सत्य/ . . .  ठरविण्याची सोय आहे. श्वासा वर लक्ष केन्द्रित करणे; पूरिया धनाश्रीचा अचूक पंचम लागणे; बुद्धिबळाचा एक डाव खेळणे;  "वृद्ध सन्यासी" सोबत संध्याकाळ घालविणे  . . . कोणाला कशात अध्यात्म/ ब्रह्म/ अंतिम सत्य/  सापडेल, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझ्या मते, आपण व्यक्ती आहोत ही धारणा कायम होणे, म्हणजेच अध्यात्म. 

. . . . पण अर्थबोध न झाल्यानं मनात कमालीची उद्विग्नता दाटून येईल (जी प्रतिसादातून व्यक्त होते आहे). पुन्हा तेच. माझ्या मनात उद्विग्नता आहे का un-उद्विग्नता आहे, याचे "ना शेंडा ना बुडखा" असे अंदाज करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नये. पण विषय निघालाच आहे म्हणून सांगतो - मासे पकडणारा बलवान राजा माझ्या शेजारीच आहे, आणि माझ्या मनात कणमात्र उद्विग्नता नाही.