तो तुमचं " एकूण" आध्यात्मिक आकलन दर्शवतो.

१. आपण सिद्ध झालोत किंवा नाही हे फक्त स्वतःच जाणू शकतो याबद्दल दुमत नाही पण सिद्धत्वानंतर सिद्ध काय सांगतो यावरनं त्याचं सिद्धत्व जोखलं जातंआत्मपूजा उपनिषद लिहिणारा ऋषी सिद्ध आहे याची साक्ष म्हणजे आत्मपूजा उपनिषद आहे. संपूर्ण जग जरी त्याच्या विरुद्ध उभं राहिलं तरी तो एकटा त्याच्या वक्तव्यानं (आत्मपूजा उपनिषद) सिद्ध ठरतो.  या उलट तुमच्या उदाहरणातला खुद्द हॉटेल मालक  जरी भाजी उत्तमच आहे  असं म्हणाला आणि गिऱ्हाईकांना ती  भुक्कड वाटली तर मालकाच्या मुजोरीनं त्याचा धंदा बसण्याव्यतिरिक्त काही होणार नाही. थोडक्यात, भाजी उत्तम आहे की बाद हे गिऱ्हाईक ठरवतात, मालक नाही. 

२. " माझ्या मते, आपण व्यक्ती आहोत ही धारणा कायम होणे, म्हणजेच अध्यात्म. " तुम्ही ऋषभ आणि पंचम घेऊन मालकंस म्हणताय आणि श्रोते उठून गेलेत तरी तुम्ही स्वतःचा  हट्ट सोडायला तयार नाही अशातला प्रकार झाला. आणि त्याही पुढे जाऊन जर तुम्ही मालकंसात ऋषभ आणि पंचम वर्ज्य ठरवण्याचा अधिकार श्रोत्यांना कुणी दिला ? असं विचारलंत,  तर तुमचा मालकंस ऐकणारे आणि म्हणणारे  उभा जन्म तुम्ही एकटेच असाल. 

३. मनातली  उद्विग्नता वक्तव्यातून प्रकट होते आणि प्रतिसाद त्याचे साक्षी असतात. स्वतःचे प्रतिसाद वाचून पाहा, लिहिताना जाणवली नसेल तर वाचताना तरी ती नक्की जाणवेल. 

असो, माझं लेखन वाचताना तुमच्या रेडीओवर दोन स्टेशन्स लागलेली असतात त्यामुळे तुम्हाला त्याचा अर्थबोध होणं असंभव आहे. त्यात तुमची कितीही इच्छा असली तरी लेखन थांबवण्याचा सध्या तरी माझा मानस नाही. तस्मात, आधी सांगितल्याप्रमाणे माझ्या लेखनाकडे दुर्लक्ष करणं तुमच्या हिताचं आहे कारण तुमच्या कोणत्याही प्रश्नाला त्यातून किंवा आता  माझ्याकडून उत्तर मिळणार नाही.  इतौप्पर तुमची मर्जी.