सॉनिक = ध्वनी , या शब्दा पासून तर सुटका नाही
सॉनिक बूम ची व्याख्या बघता "स्फोटा सारखा आवाज" असा शब्द प्रयोग आहे.
त्या अर्थाने "ध्वनीस्फोट" हा जवळचा वाटतो. पण मला तरी हे शब्दाला शब्द जुळवल्यासारखे वाटते.
कारण... चाबूक फटकारताना "ध्वनीस्फोट" होऊन मोठा आवाज येतो... हे तितकेसे संयुक्तिक वाटत नाही. इतर कुठला चांगला शब्द सापडतो का ते पाहावे लागेल.
===
सुपरसॉनिक = स्वरातीत, हा शब्दप्रयोग सावरकरांनी केला आहे.
परंतु आजकाल हायपरसॉनिक असा सुद्धा एक शब्दप्रयोग आहे. त्यासाठी काय वापरावे?