कर्मयोग हा गीतेमुळे लोकप्रिय झालेला आणि भारतीय मानसिकतेचा युगानंयुगे गोंधळ उडवून बसलेला प्रकार आहे.

कर्मयोगाच्या अध्यायात संपूर्ण गीतेत, कुठेही अकर्ता गवसण्याचा उल्लेख नाही !  निष्काम कर्मयोग, फलाकांक्षारहित कर्म अशा अवाच्यासवा आणि पूर्णपणे अव्यवहार्य संकल्पना मात्र पौर्वात्यांच्या डोक्यात घातलेल्या आहेत. मोबदला मिळणार नसेल तर कुणीही माईचा लाल सकाळी अंथरुणातून उठणार नाही आणि  एकही चाकरमान्या कुणालाही साहेब म्हणणार नाही. तरीही आपण अशा प्रकारच्या संकल्पनांचा पाठपुरावा करायचा हट्ट सोडत नाही. परिणामतः काम करू की नको, फलाकांक्षा ठेवू की नको, कर्म कुणाला अर्पण करू ? अशा गोंधळात कामाची पुरती वाट लागते. 

शिवाय हजारो वर्ष अशी प्रॅक्टिस करून कामाचा आनंद मिळणं तर दूर पण कामाची प्रतवारी होऊन व्यक्तीचं सामाजिक मूल्य त्याच्या हुद्द्यावर ठरवलं जातं ही मोठी मजेदार गोष्ट आहे. 

सदरहू लेख हा अशाच संकल्पनांचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. 

काठी तासतांना रमणांना आपण काहीही करत नाही कारण स्वरूप कायम अकर्ता आहे ही चित्तदशा गवसली होती आणि त्यामुळे ती सहा तास घासली का सहा दिवस हा प्रश्नच नव्हता. 

रमणांनी स्वतःची काठी मुलाला दिली यात देणाऱ्यालाही आनंद झाला आणि घेणाराही खूष झाला इतकाच अर्थ आहे.