पण पहिल्या श्लोकाचा रोख अकर्त्याकडे नसून कर्मफलाकांक्षा त्यागण्याकडे आहे, पाहा >
त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रय: | कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति स: || ४-२०||
ठळक केलेला भाग प्रथम आहे. अकर्त्याला कामाचीच मजा येते त्यामुळे त्याला फलाकांक्षा दुय्यम वाटते ही वस्तुस्थिती आहे !
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः। अहङ्कारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते ।।३-२७।।
या श्लोकात सुद्धा सर्व कर्म प्रकृतीवशात घडतात हा भाग प्रथम आहे ! त्यामुळे पब्लिकला सगळं देवावर सोडल्यावर मग आपण नक्की काय करायचं ? हा बेसिक संभ्रम झाला आहे. शिवाय श्लोकाच्या दुसऱ्या चरणात अहंकाराची भानगड आहे. म्हणजे देवावर सोडायचं तरी लफडा आणि स्वतः करायचं तर अहंकार अशी गोची झालेली आहे.
थोडक्यात, कृष्ण अर्जुनाला तू अकर्ता आहेस असा ठाम विश्वास कुठेही देत नाही.