म्हणजे, समजा मी रोज दारू पितो, झिंगून भांडणे, मार-झोड करतो, जुगार खेळतो व त्यात पैसे गमावतो, इत्यादी. तर या सर्व वाईट सवयी सोडण्या करता मला काहीच करण्याची गरज नाही. एक सदगुरू हुडकायचा, त्याला माझे गंतव्य स्थान -म्हणजे दारू-जुगार सोडणे - सांगायचे, व मग माझ्या मनाची सर्व दारे-खिडक्या बंद करून आपला नित्यक्रम - दारू पिणे, जुगर खेळणे - इत्यादी चालू ठेवायचे. सदगुरू काय ते पाहून घेईल. बरोबर ?