मौजो हवादिसका थपेडा न रहा,
हुई कश्ती गर्क के बेडा न रहा।
सारे झगडे जिंदगानीके थे आनिस,
एक हम न रहे, बखेडा न राहा ।


थोडक्यात, आयुष्याला दोन्हीकडून भिडता येतं. एकतर आपण नाही हा उलगडा झाला की सारे प्रश्न संपले ! किंवा मग फक्त आपणच आहोत हे समजलं की जगण्याचा आनंदोत्सव होतो!

दुसऱ्याला सिद्ध समजून त्याचं अनुसरण करण्यानं काहीही हाती लागत नाही. आपण स्वरूपानंच (किंवा मुळातच ) सिद्ध आहोत ही खूणगाठ, स्वतःशी बांधून जगायला सुरुवात केली की झालं !  

आपण सत्य होऊ शकत नाही; कारण जे सत्य आहे ते पुन्हा सत्य कसं होईल ? सत्य व्ह्यायचं नाहीये,  रोजच्या जगण्यात, हरेक प्रसंगात सत्य वापरायचं आहे !