जाणीव व्यावहारिक सत्य, प्रातिभासिक सत्य आणि पारमार्थिक सत्य अशा तीन पातळ्यांवर असू शकते.
उदाहरणः
एखादी व्यक्ती बिबवेवाडी ते हिंजवडी कार्यालयात जाण्यासाठी प्रवास करते. प्रवासाला समजा २ तास लागतात, तर प्रवासाला दोन तास लागले हे व्यावहारिक सत्य.
प्रवासात आपली प्रेयसी समवेत असेल तर तो इतक्या लवकर चुटकीसरशी का संपला असे वाटणे किंवा कार्यालयात गेल्यावर किती रटाळ काम करायचे आहे याचा विचार करत चडफडत केलेला तोच प्रवास युगायुगांचा वाटणे हे प्रातिभासिक सत्य.
आंतरिक आनंदात मग्न असलेल्या आत्मनिष्ठ व्यक्तीला नित्य आणि नैमित्तिक कर्मे करत असताना काळ, वेळ इ. चे फारसे भान नसणे किंवा ते फक्त व्यवहारापुरतेच असणे असे पारमार्थिक जाणीवेच्या बाबतीत असते.
या पैकी फक्त व्यावहारिक सत्यच वस्तुनिष्ठपणे सिद्ध करता येते. प्रातिभासिक आणि पारमार्थिक सत्य या व्यक्तिनिष्ठ अनुभूती असतात. वेदांतातल्या या संकल्पना मला मान्य आहेत.