जाणीव सर्वांची एकच आहे. जाणीवेचं वैचारिक मंथन व्यक्तिगत आहे.

प्रवास सर्वांसाठी एकच आहे. प्रेयसीसमेत प्रवास करणाऱ्याचा रोख तिच्या सहवासावर आहे,  त्या दरम्यान कार्यालयीन कामावर विचार करणाऱ्याला तो रटाळ वाटतो आणि जाणीवेशी संलग्न असणाऱ्याला तो इतर अनुभवांसारखाच एक अनुभव वाटतो.  जाणीवेशी संलग्न असणारा हे देखिल जाणतो की प्रेयसीचा सहवास असो, की कार्यालयीन काम, की निर्वेध भटकंती; सगळे अनुभव केवळ जाणीवेची भासमान रुपांतरणं आहेत; मुळात जाणण्याची प्रक्रिया जशीच्या तशी आहे.  जाणीवेला जाणणारा असा कुणीही नाही त्यामुळे जाणणं आणि जाणणारा कुणीही नाही हा बोध एकाच वेळी असणं ही मुक्तदशा आहे.