१. जर एखादी गोष्ट जाणलीच गेली नाही तर तीला अर्थ उरत नाही इतकी किमान समज कुणालाही असावी. उदा. इतर सजीवांना वेळ ही संकल्पनाच माहिती नाही, तस्मात, ते वेळ जाणू शकत नाहीत आणि त्यांच्या संदर्भात वेळेला अर्थच नाही. जाणणं ही प्राथमिक गोष्ट आहे आणि जाणलं गेलेलं दुय्यम आहे.
२. पुन्हा तीच चूक ! ज्या गोष्टी कुणाला माहिती नाहीत त्या फक्त काल्पना आहेत. जेंव्हा त्या जाणल्या जातील तेंव्हा त्यांना वास्तविकता येईल त्यामुळे जाणणं ही पहिली पायरी आहे.
३. मुळ मुद्दाच हुकल्यामुळे प्रत्येक वेळी तीच चूक होत राहाणार ! ज्या वेळी तुम्ही घरी असाल त्या वेळी घरी आहात हे जाणाल आणि येरवडा जेलमधे, तिथे आहात हे जाणाल. तद्वत, इलेक्ट्रीसिटीच्या अभावी जीव कासाविस होत असेल तर ती मनःस्थिती जाणाल. जाणणं हा काँस्टंट फॅक्टर आहे, जे जाणलं जातंय ते दुय्यम आहे. आणि हा जाणणारा हरस्थितीत अनाबाधित आहे असा मुद्दा आहे.
४. मी मागच्या प्रतिसादातच म्हटलंय की प्रथम चरणात हुकलात की पुढे काहीही समजण्याची शक्यता शून्य ! शरीराचं वजन किती झालं हा प्रश्नच नाही; ज्याला वजन कमी झाल्याची जाणीव होतेयं तो कायम, सर्वांचा, सर्वत्र आणि सर्वकाल एकच आहे. तस्मात, वेळ, काळ आणि स्थान यांचा जाणण्यावर सुतराम फरक पडत नाही.