१.  "हरिभक्त" या टोपण नावाची कोणी व्यक्ति असे म्हणते; की टी एस अनंतमूर्ती  यांनी त्यांच्या एका पुस्तकात असे म्हंटले आहे; की रमन महर्षी एकदा असे म्हणाले; की . . .

- मनोगतावर लेखन करणार्या एखाद्या सदस्याच्या हेतूविषयी  प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याआधी 'रमण महर्षी' 'अनंतमूर्ती' असे साधे गुगल सर्च करून शोधले असते तरी योग्य तो संदर्भ मिळाला असता. लेखनप्रकारात अनुवाद असे स्पष्टपणे लिहीलेले असताना लेखनहेतूविषयी अशा कुशंका उपस्थित करणे टाळता आले तरे बरे. असो.

२. रमण महर्षी असे काही बोलतील असे वाटत नाही किंवा अनंतमूर्ती यांनी आठवण शब्दबद्ध करताना काहीतरी घोडचूक केली वगैरे ...

- रमण महर्षींनी काय बोलावे किंवा त्यांच्या आठवणी कुणी कशा शब्दबद्ध केल्या पाहिजेत हे आपल्या हातात नाही. अनुवाद करताना मूळ आशयात फेरफार झाला असे निदर्शनास आणून दिले तर त्यात दुरूस्ती करायला मी सदैव तयार असेन.  मनोगत सदस्यांनी आपापल्या धारणा आणि पूर्वग्रहांनुसार त्यांना उमजलेले रमण महर्षी लक्षात घेत ते कसे बोलले असतील आणि ते बोलणे कसे शब्दबद्ध व्हायला हवे हे लक्षात घेत समांतर अनुवाद प्रतिसादात दिला (योग्य तो डिसक्लेमर टाकत) तर त्याचेही स्वागत आहे. असे करताना संदर्भ सोडून एखादे वाक्य किंवा शब्द निवडून त्यावर शब्दच्छल करणे टाळता आले तर तसा प्रयत्न अवश्य करावा असे नम्रपणे सुचवतो.

३. स्थळ, काळ, वेळ यांचे अस्तित्व ...

- अनंतमूर्तींना रमण महर्षींच्या सहवासात आनंद आणि शांतीचा अनुभव आलेला होता. ते पेशाने न्यायाधीश होते आणि त्यांचे वास्तव्य बंगलोरला होते. तिथे परत गेल्यावरही शांती टिकून राहील का आणि महर्षींची कृपा अखंड राहिल का या त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महर्षींनी त्यांच्या कृपेला स्थळ, काळ, अंतर याचे बंधन नाही असे आश्वस्त करणारे उत्तर दिल्याचे मला तरी दिसते. त्यामुळेच अनंतमूर्तींना ते भावले असे दिसते. थोडेसे स्वातंत्र्य घेऊन फार तर महर्षी त्यांच्या आंतरिक भावस्थितीबद्दल काही व्यक्त करत असतील असेही म्हणता येईल.  यात न्यूटन, आईनस्टाईन ते रेल्वेची वेळापत्रके, कार्यालयीन कामकाजाच्या वेळा, आयकर परतावा भरण्याची मुदत  ते 'डे लाईट सेव्हिंग' पर्यंतच्या कुठल्याही गोष्टी मध्ये आणण्याचे काहीच कारण नाही. या  सगळ्या व्यावहारिक गोष्टी रद्दबातल करा आणि शून्यात भेलकांडत राहा असा उपदेश  महर्षींनी केल्याचे मला तरी कुठे दिसले नाही. तरीही वेगळा अन्वयार्थ लावण्याचा अन्य सदस्यांचा अधिकार मला मान्य आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिसांदांचे स्वागतच आहे. धन्यवाद.