हरिभक्त,
तुमच्या हेतू विषयी किंवा प्रामाणिकपणा कोणीही शंका घेतलेली नाही. 'रमण महर्षी' 'अनंतमूर्ती' असे गुगल सर्च करण्याची गरज नव्हती, कारण अनंतमूर्ती यांनी पुस्तक लिहिले आहे, व त्या पुस्तकात अनंतमूर्ती यांनी तुम्ही जे उधृत केले, तसे लिहिलेले आहे – या बाबत कोणतीही शंका नव्हती / नाही. पण, महर्षी खरोखर तसे म्हणाले का, याबाबत मात्र शंका होती / आहे. शंका घेण्यास कारण असे, की "स्थल, काळ, वा अंतर अस्तित्वातच नाहीत" हे पटत नाही. अनंतमूर्ती यांनी पुस्तकात तसे लिहिले, म्हणजे महर्षी खरोखर तसे म्हणाले, असे होत नाही. कदाचित, अनंतमूर्ती त्या क्षणी भारावलेल्या (मेस्मेराईझ्ड) मनस्थितीत होते म्हणून त्यांची ऐकण्यात, काही चूक झाली असेल. किंवा जे ऐकले व त्याचे शब्दांकन केले त्या मध्ये जो काळ गेला त्यात महर्षींचे नेमके शब्द आठवण्यात काही चूक झाली असेल. अश्या, व इतर अनेक शक्यता आहेत.
असो. तुमच्या पुढच्या सर्व प्रतिसादात तुम्ही कुठेही "स्थल, काळ, वा अंतर अस्तित्वातच नाहीत" हे डिफेंड करण्याचा कोणताही प्रयत्न केला काहीत, या वरुन तुम्हालाही ते (शब्दश: अर्थ घेतल्यास) पटले नाही, हे उघड आहे. विषय संपला.
मात्र, लेख लिहिताना सुरवातीलाच, महर्षी जे काही म्हणाले ते शब्दश: घायचे नाही, त्याचा आपल्याला योग्य वाटेल तसा भावार्थ घ्यायचा आहे, हे आधीच संगीतले असते, तर उत्तर-प्रत्युत्तरांचा येवढा घोळ झाला नसता.