आज ए बी पी लाईव्ह ह्या संकेतस्थळावर ही बातमी वाचायला मिळाली.

सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचे विधेयक विधानपरिषदमध्ये मंजूर 

... यातील तरतुदी :

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने एक सक्तीचा विषय म्हणून सर्व शाळांमध्ये, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी शिकवण्यात येईल अशी तरतूद या विधेयकात आहे. २०२०-२१ पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली आणि सहावीसाठी मराठी भाषा विषय सक्तीचा केला जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक वर्षी पुढच्या इयत्तेसाठी लागू करण्यात येईल, शेवटी  २००४-०५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी आणि दहावीसाठी मराठी भाषा विषय अनिवार्य करण्यात येईल.

कोणत्याही शैक्षणिक माध्यमांमध्ये मराठी विषय अनिवार्य होणार आहे

उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे

मराठी बोलण्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कोणतेही निर्बंध लादता येणार नाहीत. तसेच मराठी भाषा बोलण्यावर निर्बंध आणणारा कोणताही फलक किंवा सूचना देता येणार नाहीत
...