अस्मिता हे असहिष्णुतेचेच सोज्वळ नाव  आहे असे समजायचे काय ? 

अजिबात नाही. 

अस्मिता म्हणजे पुरणपोळी हेच सगळ्यात श्रेष्ठ मिष्टान्न आहे अशी समजूत बाळगणे. आपल्या घरच्या कार्यात मेनू मध्ये इतर काहीही असो / नसो, पण पुरणपोळी मात्र ठेवणेच ठेवणे. केंद्र सरकार कडे पुरणपोळीला  "अभिजात पोळी" चा दर्जा देण्यात यावा असा आग्रह धरणे. पण ज्यांना मैसूरपाक आवडतो, त्यांना तो खाण्याची मुभा देणे.

असहिष्णुता म्हणजे महाराष्ट्रातील सर्व उपहारगृहात पुरणपोळी खाणे सक्तीची करणे; पुरणपोळी न खाणाऱ्यांचे व मैसूरपाक खाणाऱ्यांचे दात पाडणे / हाडे मोडणे, मैसूरपाक देणाऱ्या उपहारगृहात घुसून तोड-मोड करणे, इयादी.