तो कितीही शुद्ध आणि कितीही प्राचीन असला तरी. मंत्राचं काम फक्त शब्दांचं ध्वनीत रुपांतरण करणं इतकंच आहे.  थोडक्यात, मेंदूत चाललेली मनाची अनिर्बंध बडबड, मंत्र म्हणून किंवा जप करून एकमार्गी होऊ शकते. 

तस्मात, लेखात वर्णन केलेल्या प्रचंड सायासाची गरज नाही, साधा ॐ सुद्धा मनलावून म्हटला तर तेच काम करतो. इतकंच काय एखादं रंगून जाऊन म्हटलेलं गाणं सुद्धा तेच काम करतं. 

मंत्र किंवा जपाची भानगड अशी की या गोष्टी मनाचा प्रवाह थांबवू शकत नाहीत, त्या शब्दांचं रुपांतर ध्वनीत करतात; पण साधकाला त्यामुळे मनापासून मुक्तता मिळाल्याचा भास होतो.  या प्रक्रियेचा पुढे नाद लागतो आणि त्यापुढे बाकीच्या गोष्टी व्यर्थ वाटू लागतात कारण त्यांच्यात रस घेतला तर बॅकग्राउंडला पुन्हा मनाची बडबड सुरू होते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे ध्वनी शून्यता किंवा शांतता हे आपलं स्वरूप आहे, कोणताही मंत्र किंवा जप जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तीचा बोध होणं असंभव आहे.