त् पुढे मृदुव्यंजन आल्यास त् चा द् होतो. उदा. उत् + बोधक = उद्बोधक
त् पुढे अनुनासिक आल्यास त् चा न् होतो उदा. उत् + मादक = उन्मादक
त् पुढे च आल्यास त् चा च् होतो. उदा. सत् + चरित्र = सच्चरित्र
त् पुढे बाकी कठोर व्यंजन आल्यास त् मध्ये काही बदल होत नाही. उदा. उत् + कर्ष = उत्कर्ष
त्यामुळे बृहत् + कोश = बृहत्कोश हे रूप बरोबर वाटते
पण...

बृहद्कोश  हे येथे एक विशेषनाम (संकेतस्थळाचे नाव) म्हणून आल्याने वरील नियमातून सूट घेता येते असे समर्थन करता येणे शक्य आहे.

अर्थात वरील विवेचन हा माझा कल्पनाविलास आहे. मी व्याकरणतज्ज्ञ नाही.
चू. भू. द्या. घ्या.