१- नावाला भाषा नसते, फक्त लिपी असते. वूडहाउस हे नाव कोणत्याही भाषेत लिहिल्यास वूडहाउस असेच असणार. मराठीत ते लाकूडघर होणार नाही. त्याच प्रमाणे किरण काळे हे नांव इंग्रजीत रे ब्लॅक होणार नाही.
२- "देवनागरी लिपीत सही" याला सुद्धा फारसा अर्थ नाही. बहुतेकांची सही "वाचता" येत नाही. म्हणजे त्यात त्यांचे नाव एकेक अक्षर असे वाचता येत नाही. मी कॉलेजात गेल्या वर मला जेव्हां सही करायची गरज पडू लागली, सुरुवातीला माझ्या सहीत सी एम पी ए एन डी आय टी अशी अक्षरे दिसत असत. कालांतराने ही अक्षरे डिफॉर्म होत गेली व आता गेले काही अनेक दशके माझी सही म्हणजे केवळ "एक चित्र" आहे, असे चित्र जे फक्त मीच काढू शकतो. त्यात तुम्हाला कोंणतेही अक्षर, कोणत्यही लिपीत दिस्णार नाही.
हे अनेकदा सांगून झालेले आहे पण मराठीअस्मितांधांना हे समजणे अशक्य तरी आहे, किंवा समजले तरी ते तसे मान्य करणार नाहीत.