माझ्या मते, तुम्ही भारतात असं होईल का असं विचारत आहात? 
आतापर्यंतचा इतिहास बघता, भारतात कित्येक रोगाच्या कैक साथी आल्या, कित्येक संकटं आली, आक्रमणं झाली, पूर आले, भूकंप आले.
अशी संकटं जेंव्हा आली, तेव्हा लोकांच्या मनात आता आज जशी आणि ज्या प्रकारची भीती उत्पन्न झालेली आहे, तशीच भीती त्याहीवेळी उत्पन्न झाली असणार. पण, त्यामुळे लोकांच्या जीवनशैलीत त्यामुळे असा काही विशेष बदल झालेला दिसून आलेला नाही. 
काहीच बाबतीत आपण, त्या गोष्टी पाळतो, म्हणजे मृत्यूठिकाणी जाऊन आल्यावर, केशकर्तनाहून आल्यावर, प्रातर्विधीस जाऊन आल्यावर वगैरे. 
पण, हे सोडून आपण जीवनशैलीत फार काही, म्हणजे तुम्ही ज्या गोष्टींचा उल्लेख केलाय त्याप्रमाणे काही बदल केलेलें नाहीत.
उद्या, ह्या रोगावर एखादे औषध वा लस अथवा अन्य काही उपाय मिळाला की झालं की, कशाला हवी ती जीवनशैली? असाच प्रश्न आपण विचारणार. 
हां, आता जे पूर्वीपासूनच अशी जीवनशैली पाळत आले आहेत ते तीच जीवनशैली पुढे चालू ठेवतील. त्यांना विशेष कष्ट पडणार नाहीत. 
पण मला वाटतं त्यांची संख्या कमी असणार आहे. बहुतेक करून लोक पुन्हा कोरोनापूर्व शैलीच अवलंबतील. 
................... हे आता म्हणजे तुमची पोस्ट वाचल्यावर सुचलेलें आहे.