सज्जाद आणि पु.लं. यांच्या कीर्तीत फरक असण्याचे मुख्य कारण म्हणजे सज्जाद हिन्दी चित्रपट सृष्टीत होते, आणि पु.लं. मराठीतच अडकून राहिले. आपली मराठी कित्ती कित्ती थोर आहे, इंग्रजी व हिंदीच नव्हे तर मल्याळम, तामिळ, तेलुगू, बंगाली, . . . येवढेच नव्हे तर जपानी, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, झुलू, स्वाहिली, . . . इत्यादि सर्व भाषा मराठी पुढे फिक्या आहेत, वगैरे सर्व मान्य . पण कोणत्याही क्षेत्रात नांव कमवायचे असेल तर प्रादेशिक भाषेच्या बाहेर पडावेच लागते.
संगीतकार म्हणून सुधीर फडके हे सज्जाद आणि पु.लं. च नव्हे तर इतर पण अनेक मोठे नांव अससलेल्यां पेक्षा (जसे, मदन मोहन, खय्याम, रोशन ) खूप मोठे होते. आणि उत्तम गायक तर होतेच. संगीतकार म्हणून मी बाबूजींना नौशादच्या बरोबरीने पहिल्या क्रमांका वर मानतो. पण, मराठीतच अडकून राहिले. तुलनेत, सी रामचंद्र, वसंत देसाई, यांचे नांव झाले कारण ते हिंदीत गेले.