अस बघा, पुलंनी सिनेमा सोडला म्हणून सिनेमाचे कुठे काही कमी पडले का? माझ्या मते याचे उत्तर आहे "नाही. कुठेही काहीही कमी पडले नाही". पण पुलंनी लिहिले नसते, तर मात्र साहित्य क्षेत्राचे खूप काही कमी पडले असते. असामी असामी, बट्याट्याची चाळ, तुझ आहे तुझ पाशी, अनेक व्यक्ति चित्रे, पूर्व रंग, अपूर्वाई. . . . . या सर्वाला आपण मुकलो असतो.