सध्या प्रतिसादांची संख्या पाहता मनोगती लेख वाचतात की फक्त शीर्षकेच वाचतात असे वाटू लागले आहें  निदान १२ जून रोजी  पु. ल. या विषयावर ( आणि तेही खुद्द अपुल यांनी )लिहिलेले  वाचल्यावर  फुटकळ प्रतिसादही  मिळू नये ही कमालच की नाही ?  तरी बरे ही स्पर्धेत निवडली गेलेली  "कथा" आहे..याला कथा या प्रकारात का मोजावे हे केवळ " अपुल" च जाणोत.  तरीही या  साहित्याचा मसाला नेहमीप्रमाणे जमला नाही एवढे मात्र खरे !
        "अपुल" यानी मनोगतवरच  इतरांनीही पु. ल. यावर काय लिहिले आहे  याचा थोडा कानोसा घ्यावा असे वाटले तर ते अयोग्य ठरणार नाही ना ? कदाचित ते वाचण्याच्याही लायकीचे नसावे  हे न वाचताच त्यानी ठरवले असावे.