प्रिय कुशाग्र,

आपला लेख आधी वाचला नाही हे मान्य. पण त्याला वाचण्याच्या लायकीचा नाही असं वाटून मात्र अजिबात नाही हं.

मला कारणं द्यायची नाहीयेत. नाही वाचला हे खरं. कृपया क्षमस्व. 

आपण अगदी हक्कानं मला जाणीव करून दिलीत याबद्दल धन्यवाद. आत्ताच वाचला आणि आवडलाही. 

मी लिहिलेली 'कथा' (किंवा त्याला जे काही म्हणता येईल ते - स्फुट, ललित, कदाचित विनोदी लिखाण इ.) नेहेमीप्रमाणे झालं नाहीये असं मोकळेपणानं सांगितल्याबद्दल मनः पूर्वक आभार. सुधारायचा प्रयत्न करेन.

- कुमार

ता. क. मनोगतावर जास्त कुणी लिहीत नाही आणि वाचतही नाही याचा मलाही अत्यंत खेद होतो. कदाचित काळाप्रमाणे आपण बदललो नाही की काय असं वाटत राहतं.