खरं म्हणजे प्रतिसाद देण्याच्या लायकीची ही कविता नाही .(वाचण्याच्या लायकीचीही नाही असे म्हणून वाचणाऱ्याचा अपमान करत नाही.) केवळ अलीकडे बायकोने मी फारच घोरतो अशी तक्रार करणे सुरू केल्यामुळे तिला जरा खिजविण्यासाठी लिहिले आणि मनोगतवर काय आता कुणीच वाचत नाही तर आपली राहूदे म्हणून टाकली. आपल्या नुकत्याच लिहिलेल्या सुंदर कवितानंतर ही कविता म्हणजे अगदी पंचपक्वान्नाच्या जेवणानंतर बडिशेपेची चिमूट आहे . कारण मी स्वतः कविता वाचत नाही व लिहीतही नाही मात्र आपल्या कविता वाचतो व प्रतिसाद देत नाही कारण त्यातून व्यवस्थित अर्थ काढणे मला जमत नाही. त्याबद्दल क्षमस्व ! कविता हा आपला प्रांत नाही हे मला माहीत आहे. पण ट ला ट आणि री ला री येवढे मला जमते इतकेच. त्यामुळे मी संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी , रामरक्षा , अथर्वशीर्ष ,मेघदूत, यांचे समश्लोकी रूपांतर केले आहे केवळ आपल्या आनंदासाठी ! हे आपल्याला सांगतो ते केवळ त्यतले दर्दी आहात म्हणून !
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !