*सुखकर्ता दु:खहर्ता, वार्ता विघ्नांची अर्थ आणि लिरिक्स*
https://youtu.be/ON89kM-UhW0
॥१॥
सुखकर्ता दु:खहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥
॥धृ॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥
॥२॥
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी, कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा|
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
॥३॥
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना|
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
*सुख+कर्ता*-आनंद/समाधान+रचनाकार; *दु:ख+हर्ता*-दु:ख+हरण करून नेणारा;
*वार्ता*-बातमी;
*विघ्नांची*-संकट/आपत्ती;
*नुरवी*-न उरवी;
*पुरवी*-देणे;
*प्रेम*-प्रेम;
*कृपा*-अनुग्रह/दया;
*जयाची*-ज्याची;
*सर्वांगी*-सर्व अंगावर;
*सुंदर*-आकर्षित/चांगले;
*उटी*-सुगंधित लेप;
*शेंदुराची*-शेंदुराची;
*कंठी*-पुरुषांच्या गळ्यातील सोन्याचा किंवा मोत्याचा अलंकार;
*झळके*-चमक/चकाकी;
*माळ*-गळ्यात घातलेला हार;
*मुक्ता+फळांची*-पुष्पक/फुल+फळांची;
*जय देव*-जय देव;
*जय देव*-जय देव;
*जय मंगल+मूर्ती*-जय शुभ/कल्याण/चांगले+मूर्ती;
*दर्शन+मात्रे*-नजरभेट/पाहणे+निव्वळ/नुसता;
*मन*-मन;
*कामना*-आभिलाषा/आकांशा/इच्छा;
*पुरती*-पूर्ण होणे;
*रत्न+खचित*-रत्न+जडलेला/जडित;
*फरा*-मुकुटाचा मध्यभागी असलेले रत्न;
*तुज*-तुला/तुजला;
*गौरीकुमरा*-गणपती चे एक नाव/पार्वती+कुमार;
*चंदनाची*-गंध/लाकूड उगाळून देवास लावण्यासाठी;
*उटी*-सुगंधित लेप;
*कुमकुम*-कुंकू;
*केशरा*-केशरी रंगाचा;
*हिरे+जडित*ऱ्हिरे+जडलेला;
*मुकुट*-मुकुट;
*शोभतो*-शोभातो;
*बरा*-चांगला/योग्य;
*रुणझुणती*-मंजुळ आवाज/मधुर आवाज;
*नूपुरे*-गुंगारू/पैंजण;
*चरणी*-पायावर;
*घागरिया*-घागर;
*लंबोदर*-गणपती चे एक नाव/लंब+उदर=मोठे पोट;
*पीतांबर*-पिंवळ्या वर्णाच्या रेशमी वस्त्र;
*फणि+वर+बंधना*-नाग+वर+गांठ देणे/न हालेसा करणे;
*सरळ*-सरळ;
*सोंड*-सोंड;
*वक्रतुंड* -गणपती देवाचे एक नाव/वक्र+तोंड;
*त्रि+नयना*-तीन+डोळे;
*दास रामाचा*-समर्थ रामदास;
*वाट*-मार्ग/वाट;
*पाहे*-प्रतिक्षा/पाहती;
*सदना*-घर;
*संकटी*-अनेक कठीण प्रसंग;
*पावावे*-प्रसन्न हो;
*निर्वाणी*-शेवटचा प्रसंगाकरिता राखून ठेवलेला;
*रक्षावे*-रक्षण करणे;
*सुर+वर+वंदना*-देव+वर/पण+नमस्कार करणे;
- *विनोद बोऱ्हाडे आणि नवनाथ बोऱ्हाडे*
*भावार्थ ॥१॥*
सुख आणणारा आणि दुःख दूर करणारा / सुख - समाधान निर्माण करणारा आणि दुःख हरणारा;
वार्ता विघ्नाची (संकट/विघ्न संपवणारा) न उरवणारा व प्रेम पुरवणारा आणि ज्याची आम्हावर कृपा आहे असा.
संपूर्ण अंगावर/शरीरावर शेंदुराचा लेप आहे, गळ्यात सुगंधित फुलांचा कंठीहार झळकत आहे.
*भावार्थ ॥धृ॥*
हे गणेशा तुझ्या शुभ मुर्तीच्या निव्वळ दर्शन मात्राने सर्व मनोकामना पूर्ण होतात देवा तुझा जयजयकार असो.
*भावार्थ ॥२॥*
अनेक रत्नांनी सजवलेल्या तुला गौरीपुत्रं/पार्वती पुत्राला, कपाळी/भाळी चंदन कुंकु केसर लावून सुशोभित केले आहे.
हिरे असलेला मुकुट शोभत आहे. पायात रुणझुण वाजणारी पैंजण आहेत. आणि चरणांवर घागरी वाहत/अर्पण आहेत
*भावार्थ ॥३॥*
लंबोदर(गणपतीचे एक नाव)/मोठे पोट असलेला, पीतांबर नेसलेला आणि
नागाचे(फनिवर - नागांचा राजा शेषनाग) कमरेला बंधन असलेला/नाग कमरेला बांधून ठेवलेला.
सरळ सोंड किंवा वक्र/वाकडी सोंड असलेला तीन डोळे असलेल्या/त्रिनयन असलेल्या.
मी समर्थ रामदास (आरतीचे रचनाकार/कवी) माझ्या घरी तुझी वाट पाहत आहे/
संकटकाळी धावून यावे आणि निर्वाणी/शेवटपर्यंत कायम रक्षण करावे असा तू जो देवतांना देखील वंदनीय आहे