प्रत्येक पदार्थाची चव तर असतेच,  पण त्याचे एक स्थान असते,  आणि वेळही. 

बरोबर. पण ते स्थान आणि ती वेळ कोणती, हे प्रत्येक समाजात वेगवेगळे असते. उत्तर प्रदेशात जिलबी हा स्टँडर्ड सकाळच्या नाश्त्याचा पदार्थ आहे. जिलबीचे तुकडे करून उकळत्या दुधात घालतात, कालची पोळी कुस्करून घालावी तसे, आणि खातात. पूर्वग्रह बाजूला ठेवून करून बघा - छान लागत.