जिलेबी आणि रबडी रात्री, लग्नाच्या वगैरे जेवणात. आणि  "एकत्र करतात" हा शब्द प्रयोग चुकिचा आहे. जिलेबी वर रबडी घालतात, जसे आईसक्रीम वर चोकोलेट सौस घालतात, तसे. कोणता पदार्थ  कसा बनवावा, कसा खावा, हे केवळ स्थान-सापेक्षच नाही तर सवयीचा परिणाम पण असतो. 

साबूदाणा खिचडी हा उपवासाचा पदार्थ आहे अणी उपासाच्या दिवशी कांदा-लसूण वर्ज्य आहे. पण साबूदाणा खिचडी आपण एरवी पण करतोच की. मग तेव्हां साबूदाणा खिचडीला चांगली कांदा-लसूण फोडणी द्यायला काय हरकत आहे ? मी देऊन पाहिली, मस्त लागत. करून बघा. 

तुम्हाला सकाळी जिलबी म्हणजे  विचित्र वाटत असेल, तर आणखीन तीन "धक्के" देतो. पहिला, पंजाबात कार्ल्याची मिठाई ही एक फेमस मिठाई आहे. कार्ल्याला बरच वेळ पाण्यात उकडून त्याच कडूपण काढून टाकतात. मग त्यात मावा वगैरे सारण भरुन, पाकात बुडवून काढतात, वर चांदीच वर्ख लावतात.  दुसरा, पाकिस्तानात गाजराच्या हलव्या वर उकडलेल्या अंड्याचे काप घलतात. आणि तिसरा, कालच एका गुजराथी मित्राने पाठवलेली रेसिपी - पुरण पोळी करायची; त्याचे साधारण दीड- इंच रुंद अश्या पट्ट्या कापायच्या; मग एका सर्विंग बाओउल मध्ये एक थर पुरण पोळी, त्यावर एक थर वॅनिला आईसक्रीम, परत एक थर पुरण पोळी, एक थर वॅनिला आईसक्रीम , अस करत जायच, शेवटी त्या वर चोकोलेट सॉस.