सवयीचा  परिणाम असतोच.  म्हणून तर पहाटे पहाटे, रेल्वे स्टेशनवर जिलेबी पाहून कसेतरी वाटले इतकेच. 

आमच्या भिलाईमधील स्वागत समारंभात, अनेक पदार्थांपैकी एक रबडी आणि जिलेबी हा एक पदार्थ होता. पण त्याची चव घेण्याचा धीर नाही झाला.  
साबुदाणा खिचडीत कांदा लसूण ?  कठीण आहे. 
गाजर हलव्याबरोबर अंडी म्हणजे त्या हलव्याची चवच गेली की.. पण असते एकेकाची आवड. 
बासुंदीमध्ये पुरणपोळी कुस्करून खाणारे वीर पाहिले आहेत. 
आणि भातावर सुधारस किंवा गुलाबजामचा पाक घेऊन खाणारे पण ... 

कार्ल्याची बर्फी प्रकार काही रूचला नाही. कार्ल्याची नैसर्गिक (कडू) चव बदलून, त्याला गोड करणे हा अन्याय आहे.