हनुमानाकडे एक लक्ष्यं होते, तो सर्वत्रं श्रीराम शोधत होता, परंतु सुबोधकडे काही लक्ष्यं पण नाही. तो जशी वळणे लागतील तसा वळत राहतो.
आणि म्हणून उपकथेत राम नाही असे तुम्हाला म्हणायचे असेल असे मला वाटले होते. असो ..
सरळमार्गी आयुष्य जगणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबाच्या कथेत (सॉरी, तुमच्या व्याख्येनुसार ही कथा नाही, पण दुसरा शब्द सुचला नाही)
चमत्कारिक, नाटकीय घटना आणायच्या कुठून? ओढून ताणून आणता आल्या असत्या पण ते बरं वाटलं नसतं. म्हणून अशी निवेदनात्मक कथा लिहिली.
तुमच्या प्रांजळ अभिप्रायाबद्दल आभार.
-- आणि माझ्या भावना इतक्या सहजपणे दुखावल्या जात नाहीत. काळजी नसावी.