या जोडशब्दाचा अर्थ फारा दिवसांनी परतून कळाला!
अभिनिवेश नाही, राजकारणावर (आणि नेत्यांवर) उगाचच ताशेरे नाहीत, मनोगतवर चक्कर मारल्याचे सार्थक झाले!!

एक अपवाद वगळता - "पोलीस भाऊ माझ्यावर कसा डाफरला हे बायकोला सांगण्याची माझी काही प्राज्ञा नव्हती, कारण त्यात तिच्याकडूनही डाफरला जाण्याचा मोठा धोका होता".
उगाचच पत्नीला मध्ये ओढून आपण कसे तिला घाबरतो छाप 'विनोद' करण्याचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी सुमार दर्जाचे अनेकानेक लेखक समर्थ आहेत. तुम्ही आपली तुमची निर्मळ निवेदनशैली शाबूत ठेवा...