अप्रतिम विवेचन चौकस!
हिंदी भाषेची खुबी, या लेखकांची ओळख आणि त्यासोबत आपलं कादंबरी कशी वाचावी हे सांगणंही आवडलं.
'एकंदर कथानक नंतरनंतर सरधोपट होत जाते, उत्कंठा अशी राहत नाही. पण म्हणून 'आता बास' असेही वाटत नाही. '
डॅफ्ने ड्यू मॉरियेची 'माय कझीन रेचल' ही कादंबरी वाचल्यावर जाणवलं होतं की जी गोष्ट एक-दोन वाक्यांत सांगता येईल ती कादंबरीकार किती प्रभावी करू शकतात!
मी एकच हिंदी कादंबरी वाचायचा प्रयत्न केला होता.... ती आवडलीही होती - अजूनही तिच्यातली काही वाक्यं लक्षात आहेत, पण लिपी तीच असूनही वाचायला (भाषा कळायला) खूप परिश्रम झाले होते. आपण इतक्या सहजतेनं वाचून तिचं सौंदर्य दाखवू शकता हे विशेष.
- कुमार