मा. प्रशासक.
मनोगत बदलतंय. फार छान. अर्थात आम्ही सगळे मनोगती, मनोगतचे नवे रूप पहायला आणि वापरायला अतिशय उत्सुक आहोतच. आजतागायत मनोगतींनी दिलेली लेखने, कविता, साहित्य आणि इतर सर्वप्रकारचे लेखन, मनोगतने फार छान पद्धतीने मांडले. काही त्रुटी येत आणि समजत गेल्या आणि त्यावर मातही होत गेली.
परिवर्तन हा जगाचा नियम आहे. त्या नियमास अनुसरून मनोगतदेखील बदलते आहे. चांगलंच आहे. नव्या रूपातील ह्या मनोगतात भरपूर काही नवे पहायला आणि अनुभवायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
पुनर्भेट लवकरात लवकर होवो, हीच सदिच्छा!!
कृष्णकुमार द. जोशी