आशा करतो अगदी सगळ्या जुन्या सुविधांसह नाही पण शुद्धिचिकित्सा चालू राहिल. आता इथे (आणि इतरही कोणत्याही संस्थळावर) लेखन करत नसलो तरी या सुविधेचा खूप उपयोग होतो.
एखाद्या साईटवर फक्त हा शुद्धिचिकित्सेसह असणारा एडीटर देता आला तरी खूप मदत होईल.
आजवर शब्दकोडी असोत, लेखमालिका असोत किंवा शुद्धिचिकीत्सा असो, तांत्रीकदृष्ट्या मनोगत इतर कोणत्याही मराठी साईटपेक्षा सर्वाधिक सोयी पुरवत आली आहे. त्याबद्दल एक खूप जुना वाचक म्हणून मनःपूर्वक आभार!
येत्या काळात साईटच्या नवीन रुपड्यासाठी शुभेच्छा! मात्र हे जुने रुपडे मी तरी नक्कीच मिस करेन!