कथा छान फुलवली आहे.

पण एक आहे. नुसत्या केस पांढरे होण्यावरून तारुण्य नाहीसे होत नाही. बाकी चेहऱ्यावरचा तजेला, डोळ्यातले भाव आणि एकंदर देहबोली ह्या सगळ्यातून व्यक्तिमत्त्वाची छाप पडते.

माझ्या कॉलेजात एक मुलगी होती तिचे केस असेच पांढरे होते. पण दिसायला तरतरीत असल्याने कुणाला ती तरुण वाटली नसणे शक्य नाही.