केदार,
कथालेखन सुरेख, कल्पनाही. मला असं वाटलं की शेवटच्या जाईच्या प्रश्नाचं उत्तर केतनकडून आलं असतं तर त्यावर पुढे मोकळी चर्चा त्या दोघांत (अर्थात हा लेखक म्हणून तुमचा प्रांत आहे, मी उगाचच सुचवतोय) आणि त्या अनुषंगांनं वाचकांतही झाली असती.
जसा एक विचार रुळत जातो, प्रगल्भ होत जातो, तशी दुसऱ्या/पुढच्या विचारालाही चालना मिळते. पांढरे केस आणि तारुण्य किंवा भेटून एकमेकांचे विचार पटले तर त्यातली अनपेक्षितता यापलीकडेही चर्चा होऊ शकेल.
- कुमार