मनोगतंचं पुनरागमन आवडले. आयसीयूत असलेलं 'मनोगत' काही बरं होतं नाही, असे वाटले. कधी काळी आपलंही पहिलं प्रेम असलेल्या 'मनोगतची' ही खंगलेली अवस्था बघवत नव्हती. देवावर विश्वास नसला तरी, मनोगतला बरं वाटू दे, अशी प्रार्थना केली होती. अधून मधून प्रशासक 'काळजी मोड' मधे आहेत की नाही हे पाहावे म्हणून मदतीचे निमित्त करुन हालहवाल तपासून पाहिले. त्यांचा उत्साह टवटवीतच होता, हे पाहून बरे वाटले. बाकी, मनोगतच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आहेतच.
बाकी, आज एक लेखन ट्रायल बेसवर टाकून पाहिले. ते लेखन अनुमतीचं धोरण अजून चालूच आहे का ? ( हे राम, कपाळावर हात मारुन घेतलेली स्मायली)
-दिलीप बिरुटे