बहुधा आधी लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि नंतर टी सिरीज यांनी अनुराधा पौडवालबरोबर करार केला होता. त्यात तिला प्रतिलता म्हणून लोकांसमोर आणायचं असं व्यापार-तत्त्व होतं. टी सिरीजच्या अनेक ध्वनिफितींत तिचं नाव पहिलं असायचं आणि अनेक गाणी चित्रपटात नसली तरी तिच्याकडून गाऊन घेतलेली असायची. (उदा. 'हम तो मशहूर' - दिल है के मानता नहीं)... बाकी ती इतर गायिकांसारखीच (प्रत्येकीत काही चांगलं) होती.
मला वाटतं अलका याज्ञिक जास्त लाडिक / प्रभावी गाते (उदा. लगान) पण अनुराधा/साधना सरगम यांची शास्त्रीय संगीताची किंचित सरस आहे. कविता कृष्णमूर्तीला शास्त्रीय गाण्यांसाठी जास्त वापरलं गेलं पण जरी बैठक चांगली असली तरी तिला मर्यादा होत्या. पुढे श्रेया घोषालनं (देवदास पासून) हा प्र्श्न सोडवला.
- कुमार