चौकस,
आपण इतर भाषांमधल्या चांगल्या चित्रपटांची माहिती खुसखुशीतपणे लिहिण्याचा (त्या भाषांवर आकस न ठेवता) छान उपक्रम सुरू केला आहे. शुभेच्छा! (मला पंजाबी फार कळत नाही, पण संदर्भ लागतो. ऐकायला फार गोड आहे. 'कितनी वड्डी गल है' वगैरे...)
- कुमार
ता. क. 'झुणका' याला एकशब्दी प्रतिशब्द शोधण्याची कल्पना मस्त... 'सेव्हरी कस्टर्ड' असे दोन शब्द सुचले. आता 'कस्टर्ड' ला मराठीतला एक-शब्द शोधतोय. 'गोडाचं पिठलं' असे दोन सुचतायत. चि. वि. जोशींची एक गोष्ट आठवली - तिच्यात श्रीखंडाऐवजी संस्थानिक पंगतीत पिठलं वाढू लागले होते (गरिबी आल्यावर).