नमस्कार रणजित.

आपण शत्रू मानलं नाही तर त्याचं कौतुक करताना दु:खही होणार नाही, असं मला वाटतं. मेहंदी हसन, गुलाम अलींच्या गझला मला आवडतात. मग त्यापेक्षा आपला जगजीत चांगला असं म्हणण्यापेक्षा सगळ्यांचंच चांगलं ऐकून आनंद घ्यावा. 

मला वाटतं आपण सामान्य माणसं (दोन्ही देशांतली) या मानव-निर्मित कुंपणांमधे न अडकलो तर जास्त समृद्ध होतो. तुम्हांलाही त्या मालिका चांगल्या आढळल्या आहेत असं तुम्हीं लिहिलंय म्हणून हे लिहावंसं वाटलं.

शत्रुत्व कालबाधित आहे तर या गोष्टी कालातीत आहे (आत्ताच संजय क्षीरसागरांचा लेख वाचला त्यामुळे हा विचार आला असावा :)) असंही वाटलं.

- कुमार