चेतन,

'ग्रीक मराठी' हे शीर्षक आणि हा विषय - दोन्ही आवडले. 

काही मुद्दे - 

माझा इंग्रजी सोपे / रुळलेले शब्द, त्यामानाने जुन्या झालेल्या मराठी शब्दांऐवजी वापरायला विरोध नाही (उदा. टेबल/मेज, पेन/लेखणी इ.) भाषा, संस्कृती अशा रीतीनं बदलत राहणारच.

वर आपण लिहिलेल्या लेखातले प्रतिशब्द विशेषत: तांंत्रिक विषयांतून आधी इंग्रजीत आल्यामुळे आपल्याला आधी कळले आहेत. जर अभियांत्रिकीचा अभ्यास/संशोधन जर मराठीतून झालं असतं तर मराठी शब्दही आपल्या ओठी रुळले असते, असं मला वाटतं. त्या ओघात कदाचित आणखी सोपे शब्द आलेही असते. तंतू प्रकाशिकी मला कळायला जड गेला, फ़ायबर ऑप्टिक नेहमी उल्लेखतो तरी... कदाचित त्याचा प्रकाश-धागा झाला असता. अर्थात, हे जर-तर लिहिण्याचं कारण म्हणजे जर्मन, फ्रेंच, चिनी इ. भाषांमधे ह्या प्रश्नाशी त्यांनी तडजोड केली आहे, हा विचार. अलीकडेच मराठीत अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे असं ऐकलंय आणि कदाचित हे बदलेल असंही वाटतं. (हे बहुधा स्वप्नरंजन आहे.) बदलण्याचा अट्टाहास हास्यास्पद होतो, हे मात्र मान्य. कदाचित सुवर्णमध्य सापडेल. 

हल्लीच अच्युत गोडबोल्यांच 'अर्थात' हे अर्थशास्त्रावरचं सुंदर पुस्तक वाचलं. खूप मजा आली. वाचताना लक्षात आलं की पाठ्यपुस्तकासारखं अभ्यासाचं एखादं मराठी पुस्तक दहावीनंतर (१९८९) प्रथमच वाचतोय! असे दोन्ही गोष्टी वाचायचे आनंदही उपभोगता यावेत म्हणून काही पुस्तकं / शब्दही वाढावेत असं वाटतं...  म्हणून या लांबलचक उत्तराचा खटाटोप!

- कुमार