अलीकडेच मराठीत अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे असं ऐकलंय .
हे खर असेल तर अत्यंत दुर्दैवी आहे. मराठीत "अभियन्त्रीकीचा अविवाहित" (म्हणजे बॅचलर ऑफ़ इन्जीनियरिन्ग) केलेल्याला महाराष्ट्रा बाहेर कुठेही नोकरी मिळणार नाही. परदेशात तर सोडाच, भारतातच इतर प्रदेशात सुद्धा कोणी त्याला नोकरी देणार नाही, आणि देऊ पण नये. त्या पुढे, केन्द्रसरकार मधे किंवा केन्द्रसरकारच्या पीएसयू मधे पण नोकरी मिळणार नाही कारण केन्द्रसरकारच्या नोकरीत भारतात कुठही बदली होऊ शकते.
त्या ही पुढे, महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही विभागात नोकरी जरी मिळाली, तरी तिथे पण तो कुचकामीच ठरेल कारण त्याचे "द्रवचालन" इतरांना कळणार नाही, आणि इतरांचे हायड्रॉलिक्स त्याला कळणार नाही. हे विद्यार्थी अभियांत्रिकीच्या कामा करता १००% अन-एम्प्लोयेबल असतील, आणि "मराठी अभियांत्रिकी" चे प्राध्यापक बनून अणखीन अन-एम्प्लोयेबल "अभियन्त्रीकीचे अविवाहित" निर्माण करण्या व्यतिरिक्त इतर काहीही करू शकणार नाहीत.