वरील उत्तर मी पाठवल आणि लोकसत्ता ऑन-लाईन उघडला. जाड अक्षरात मथळा होता ‘जाव्यास’समोरील ‘अस्तित्वा’रिष्ट! मला कळेना हा "जाव्यास" काय प्रकार आहे. लिंक उघाडल्या वर बातमी होती - ‘जाव्यास’समोरील ‘अस्तित्वा’रिष्ट! जागतिक व्यापाराच्या शिस्तबद्ध वृद्धीसाठी जागतिक व्यापार संघटना म्हणजेच ‘जाव्यास’ची स्थापना १९९५ मध्ये झाली. दर दोन वर्षांनी होणारी सभासद राष्ट्रांच्या व्यापारमंत्र्यांची परिषद ‘जाव्यास’चे सर्वोच्च धोरण व्यासपीठ आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल कि एका जागतीक संघटनेच नांव मराठित आहे? तर, तस काहीही नाही. जाव्यास नांवाची कोणतीही संघटना नाही. आधी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनाईझेशन याच मराठी भाषांतर केल, जागतिक व्यापार संघटना, आणि मग त्याचा शॉर्ट फ़ॉर्म केला, जाव्यास. लेखक नक्कीच तीव्र मराठ्ठ्याहासने ग्रस्त आहे.

दिल्ली येथे वायुसेनेच एक म्यूजियम आहे. फ़ार कमी लोकांना माहीत आहे. अमेरिकेतील स्मिथ्सोनियनच्या तोडीच नसल तरी छान आहे. आमच्या कडे पुणे-मुंबइ येथून येणाऱ्या पाव्हणे मंडळीत "बच्चे" लोक असले कि मी त्यांना तिथे घेऊन जात असे. तिथे अनेक खरी विमाने (मॉडेल नव्हे) ठेवली आहेत. त्यातले एक "लिब्रेटर बॉम्बर", दुसऱ्या महायुद्धातले त्या काळचे मोठे बॉम्बर विमान. पूर्वी त्याच्या शेजारी इंग्रजीत पाटी असे कि दुसऱ्या महायुद्धात पॅसिफ़िक थियेटर मधे या विमानाने महत्वाची कामगिरी केली. पॅसिफ़िक थियेटर" म्हणजे पॅसिफ़िक समुद्र  व आसपासचे क्षेत्र. त्या नंतर एकदा तिथे गेलो असताना इंग्रजीच्या शेजारी हिन्दीत पाटी होती "इस विमान ने दूसरे महायुद्ध मे शांतता सभागृह मे महत्व पूर्ण योगदान दिया". हे शांतता सभागृह कुठे आहे आणि त्या शांतता सभागृहात एक बॉम्बर विमान कसे घुसले, आणि का, आणि त्या विमानने काय कामगिरी केली असे अनेक प्रश्न तुम्हाल पडले असतील. उत्तर सोप आहे. तर, हिंदीत पाटी असली पहिजे, सरकरचा आदेश आहे - म्हणून पॅसिफ़िक थियेटर चे शांतता सभागृह झाले. भाषाप्रेमांधा चा नमूना.