मुद्दा मला अमूक शब्द आवडले आणि तमूक शब्द आवडले नाहीत, असा नव्हता. मला सुट्या सुट्या शब्दां मधे सौन्दर्य दिसत नाही. भाषेत सौन्दर्य दिसत, पण ते सुट्या शब्दां मधे नसून शब्द योजनेत असत. स्वरां मधे पण मला सौन्दर्य दिसत, अमाप सौन्दर्य दिसत, पण ते सुद्धा एकेकट्या स्वरां मधे नसून स्वर योजनेत असत. "हे गिरिधर गोपाल" या मुलतानी मधे अमीर खां साहेबांचा अती-तीव्र मध्यम असा मस्त लागला आहे, पण त्याच सौन्दर्य इतर स्वर व त्यांचे "चलन", ज्यांच्या मुळे तो राग मुलतानी बनतो, त्यात आहे. कोणी नुसता सुटा अती-तीव्र मध्यम आकारला, तर त्यात कसल आहे सौन्दर्य ?
प्रश्न शब्द आवडले / आवडले नाहीत असा नव्हता. कोणाला अर्थ कळो वा न कळो, जबरदस्तीने प्रतीशब्द जन्माला घालण्याच्या अट्टाहासाला विरोध आहे. आणि हा विरोध पण मुख्यत्वे तांत्रिक संज्ञांच्या प्रतिशब्दांना आहे. स्पेक्ट्रम ला स्पेक्ट्रमच राहून द्यावे, त्याचा ध्वनीवर्णपट करू नये. आणि पॅसिफ़िक थियेटर ला पॅसिफ़िक थियेटरच राहून द्यावे, त्याचे "शांतता सभागृह" किंवा "पॅसिफ़िक सभागृह" सुद्धा करू नये.