धारणा या मनानी धारण केलेल्या कल्पना आहेत.
कल्पना सोडायला फक्त दोनच गोष्टी लागतात : (१) कुशाग्र बुद्धिमत्ता आणि (२) धारणा मुक्तीतून मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव. एकदा धारणामुक्तीचा आनंद कळला की धारणा आपल्यावर पुन्हा स्वार होऊ शकत नाहीत.
अशा सर्व धारणांचं निराकरण करत गेलो तर सर्वात शेवटची जी धारणा उरते ती म्हणजे आपण सत्य नसून व्यक्ती आहोत. त्या धारणे पासून मुक्तता म्हणजे सिद्धत्व !
थोडक्यात, आपण सत्य होतो पण व्यक्ती आहोत या भ्रमात जगत होतो इतकाच तो उलगडा आहे.