इथे आपण सर्व लेखकाच्या अनुभवविश्वापासून दूर आहोत, असे वाटते. त्यामुळे पुस्तकाकडे पाहून आपली प्रतिक्रिया धक्का बसल्याची आहे असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
कथालेखकाने ज्या प्रकारचे अनुभव घेतलेले आहेत त्याला 'सहानुभावी' अशा व्यक्तींनी हे किंवा असे आत्मकथनपर पुस्तक वाचले तर त्यांची प्रतिक्रिया काय होते/होईल?
हे विचारण्याचा उद्देश असा की पुस्तकांतून असे धडे असायचे. उदा 'आणि लोक म्हणतात मी भिकारी आहे म्हणून ...' ही कवठेकर नावाच्या लेखकाची गोष्ट पाठ्यपुस्तकात होती. ती वाचताना आमचे शिक्षकही रडवेले झाले होते. किंवा त्यापूर्वी अ. शं. अग्निहोत्री ह्यांची अशीच एक कथा होती. ( वडिलांनी पगार झाल्यावर मुलांसाठी फुटाणे आणले .... अशी काहीशी कथा होती.) ती ही वाचता यायची नाही. मात्र त्यावेळी लेखक, वाचक आणि ते सारे ऐकणारे विद्यार्थी हे साधारण एकाच अनुभव विश्वातले होते.
येथे तसे नाही, म्हणून हा प्रश्न मनात आला.
येथे हे पुस्तक मी वाचलेले नाही आणि त्यातल्या मजकुराचा वरच्या दोन गोष्टींशी तुलना करण्याचा उद्देश नाही. मला फक्त लेखक-वाचक एकाच अनुभवविश्वात असताना आणि भिन्न अनुभवविश्वात असताना रसग्रहणात काय फरक दिसून येतो/येईल ह्याबद्दल जिज्ञासा आहे.
वरील आठवणींमध्ये तपशीलांची गफलत झालेली असण्याची शक्यता आहे. मला विस्मरण झाले असावे मात्र ते तपासून पाहता आले नाहीत. क्षमस्व.