जम्मू-कश्मीरमध्ये एके काळी (१९८०! गेऽले ते दिवस, इ.इ.) 'अमूकतमूक वैष्णो ढाबा' अशा प्रकारच्या पाट्या पाहिल्याचे स्मरते. येथे 'वैष्णो'चा अर्थ 'शुद्ध शाकाहारी' असा घ्यायचा.

साधारणतः त्याच सुमारास/त्यापुढील दशकात दिल्लीत हिंदू ढाबा/मुस्लिम ढाबा अशा स्वरूपाच्या पाट्या पाहिल्याचे स्मरते. (पैकी, हिंदू ढाब्यांमध्ये, माझी स्मृती दगा देत नसेल, तर, सामिष भोजन मिळत नसे. चूभूद्याघ्या.) येथे, हिंदू/मुस्लिम हे मला वाटते पाकपद्धती/अपेक्षित ग्राहकसंच अशा अर्थाने घ्यायचे; तेथे कोणास यावयास/खावयास परवानगी आहे, अशा अर्थाने नव्हे. म्हणजे, उडुपी भोजनालयांतून बिगर-उडुप्यांस मज्जाव नसतो, अथवा मराठा खाणावळींत पाऊल ठेवण्यास ब्राह्मणांस मनाई नसते, अथवा चायनीज रेष्टारण्टांतून बिगर-चिनी लोक खाऊ शकतात, तद्वत.