दात्यांच्या शब्दकोशात कार्ड - कॅड - कॅट - क्याट असे स्पष्टीकरण दिलेले आहे.

माझी कल्पना थोडी वेगळी आहे. गठ्ठा ह्या अर्थी स्टॅक असे म्हटले जाते.  स्टॅक - वर्णविपर्यय - कॅट्स - अपभ्रंश - कॅट - (क्याट!) असे काहीसे झाले असावे.

मी अशी कल्पना करण्यामागे खालील कारणे आहेत.

जेव्हा लोक नवा (अद्याप अपरिचित) शब्द ऐकतात तेव्हा तो तसाच्या तसा स्वीकारण्याऐवजी अगोदर माहीत असलेला शब्दच आपण ऐकतो आहोत असे त्यांच्या मनात येते. (अर्थाचा उलगडा पुरेसा समाधानकारक न झाल्याने कदाचित ऐकताना काही चुकले असेल असे वाटून).

दोन उदाहरणे:

१.(माझ्यासमोर घडलेले) : आयायटी मुंबईचा युवामहोत्सव 'मूड इंडिगो' ह्या नावाने प्रसिद्ध आहे. मात्र त्याविषयी बोलताना सुरक्षा कर्मचारी आम्हाला "काय हो, ह्या वर्षी मूड इंडियाला कुठले नाटक आणणार?" असे विचारत. (येथे इंडिगो हा अपरिचित शब्द आणि इंडिया हा परिचित शब्द.

२.(ऐकीव) : राष्टाध्यक्ष क्लिंटन भारतभेटीवर असताना. ग्रामस्थ त्यांचा उल्लेख 'क्विंटल' असा करीत. (येथे क्लिंटन हा अद्याप अपरिचित शब्द; पण  क्विंटल परिचित शब्द)

मुलेही लहानपणी पहिल्यांदा 'द्राक्ष' शब्द ऐकल्यावर त्याला 'राक्षस' म्हणत असल्याचे ऐकलेले आहे.