"आयआयटी मुंबई" अशी कोणतीही संस्था नाही. आयआयटी बॉम्बे आहे. मूळच्या पाच आयआयटी १९६१ साली संसदेने केलेल्या एका कायद्याने अस्तित्वात आल्या. या कायद्यात त्यांची नांवे खडगपूर, कानपूर, बॉम्बे, मद्रास आणि दिल्ली अशी आहेत. बॉम्बेचे शहराचे जरी मुंबई शहर झाले, तरी कायद्यात नमूद आयआयटी चे नांव बदलत नाही. जसे, बॉम्बे डायिंग ही कापड गिरणी अजूनही बॉम्बे डायिंग च आहे, त्याचे मुंबई डायिंग झाले नाही. तसे करायचे असेल तर कंपनी रजिस्ट्रार कडे जाऊन नांव बदलून घ्यावे लागेल. आणि महमूदचा "बॉम्बे टू गोवा" हा सिनेमा "मुंबई टू गोवा" झाला नाही. तसेच. १९९५ पर्यंत आयआयटी बॉम्बे ही संस्था बॉम्बे या शहरात होती, १९९५ नंतर हीच संस्था मुंबई या शहरात आहे. त्याच प्रमाणे आयआयटी चेन्नई अशी कोणतीही संस्था नाही. चेन्नई या शहरात आयआयटी  मद्रास आहे. 

जाता जाता - १९९४ पासून सरकारने नवीन आयआयटी बनविण्याचा धडाका लावला, आणी आजच्या घडीला त्यांची संख्या २९ येवढी आहे. पण आयआयटी म्हणजे चकल्या नव्हेत, कि घातले सोऱ्यात पीठ आणि पाडल्या २४ नवीन आयआयटी. आयआयटी या संस्थेची जी काही रेप्यूटेशन आहे, ती कष्टाने मिळवावी लागते, सातत्याने "परस्यूअन्स ऑफ़ एक्सलन्स" करून. अजून तरी ही रेप्यूटेशन मूळच्या पाच आयआयटींचीच आहे. 

एक प्राऊड (मूळ) आयआयटीयन