तुम्ही माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा. प्रश्न कायद्यात नमूद नांवाचा आहे. 'युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे' अशी संस्था एक खास कायदा करून स्थापन  झाली होती का? मला माहीत नाही. जर तसे नसेल, तर त्याचा उल्लेख मुंबई विद्यापीठ असे करायला काहीच हरकत नाही. पण जर 'युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे' ऍक्ट असा कायदा करून त्याची स्थापना झाली असेल, तर त्याचे नांव बदलून 'युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई' असे करायला कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया फ़ॉलो करून नांव बदलावे लागेल.

तसे न करताच त्याचा उल्लेख 'मुंबई विद्यापीठ' असा करणे हा काही फ़ौजदारी गुन्हा नाही. पण म्हणून तसे करणे बरोबर होत नाही. पण आपल्या देशात अनेक "भाषास्मितांध" (= भाषा + अस्मिता + अंध) असल्याने आपल्याला अशी काहीच्याबाही नामकरण करण्याची खोड आहे. जसे ईजिप्त या देशाला हिंदीत "मिस्र" असे लिहितात. आधीचा बर्मा, आणी आता म्यानमार, याला ब्रम्हदेश म्हणतात. खर तर हा शुद्ध मूर्खपणा आहे. त्यांच्या देशाचे नांव काय, हे ते ठरविणार कि आपण ? काही हजार वर्षां पूर्वी कदाचित त्या प्रदेशाचे नांव ब्रम्हदेश असेल. पण आज त्याचे नांव म्यानमार आहे. उद्या एकादा देश जर भारताचा उल्लेख भारत/ इंडिया/हिन्दुस्तान ही तीनही नांवे सोडून काही तरी भलत्याच नांवाने करू लागला आपण त्याला काय म्हणू ?  मूर्ख कुठचा, असेच म्हणू ना ? पण आपण तसे करतो. 

असो. कायद्यात बॉम्बे असे नांव असल्याने त्याचे नांव अजून पण तेच असल्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मुंबई येथील हायकोर्ट. याचे नांव अजून सुद्धा हायकोर्ट ऑफ़ बॉम्बे असेच आहे. त्याची वेबसाईट सुद्धा bombayhighcourt.nic.in अशीच आहे. वेबसाईट उघडून खात्री करून घ्या.